एम.जे. च्या खेळाडूंचे अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत यश

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी दोन खेळाडूंची निवड  

कल्याण : ठाणे जिल्हास्तरीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा १५ ते १७ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आली होती. त्यात एम.जे. स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या १० खेळाडूंनी स्पर्धेत भाग घेतला होता. ज्यात १८ वर्षा खालील मुलांमध्ये देवेश भोसलेने लांब उड़ी व उंच उडीमध्ये दुसरा क्रमांक मिळविला. मंथन लवेकरने थाली फेक मध्ये द्वितीय क्रमांक मिळविला. २० वर्षा खालील मुलांमध्ये अभय  वळवी लांब उड़ी व २०० मीटर शर्यतीत तिसरा क्रमांक पटकावला. मंथन लवेकर व देवेश भोसले यांची १९ ते २२ जानेवारी या कालावधीत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी ठाणे जिल्हासाठी निवड झाली आहे. सर्व विजेत्या खेळाडूंचे एम.जे स्पोर्ट्स फाऊंडेशनचे प्रशिक्षक नितीन पाटोळे, अध्यक्ष मितेश जैन, उपाध्यक्ष कबिंदर गुप्ता, सचिव गणेश भंडारी, सचिव अक्षय चौगुले सदस्य प्रवीण त्रिपाठी, राज चौरसिया यांनी अभिनंदन केले.

 303 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.